प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची सेवा, उपासना, नामजप, मंत्रजप, का करावा या विषयीचे महत्व व माहिती
१) कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असलेने प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीचा देवघरात टाक असेल मुर्ती असेल फोटो असेल तर त्याची नित्यनेमाने पुजा करावी. त्याने ती आपले परिवारावर खुश राहून आपले व परिवाराचे रक्षण करते आपल्यावर व आपले परिवारावर येणारे संकट व आपत्ती दूर करते.
२) आपल्या मुला-मुलींचे शिक्षण, करियर, वर्तन, योग्य प्रकारे होवून त्यांचा विवाह योग उत्तमरित्या घडवून आणते.
३) परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा, करणी, नजरदोष या पासून संरक्षण करते.
४) आपली सर्व प्रकारे उन्नती करुन आर्थिक बाजू भक्कम करते.
५) नित्य सेवेने सर्वप्रकारची सुखे, संपत्ती, आयुष्य यांची वृद्धि करते.
६) ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करुन नवर्णाव मंत्राचा रोज १०८ वेळा मंत्रजप करावा.
७) ज्यांना आपली कुलदेवी माहीत आहे त्यांनी निदान कमीत कमी वर्षातुन एकदा तरी आपले मुळ कुलदेवीचे दर्शनाला जावून तिची ओटी, चुडा भरुन मानसन्मान करावा नाकघासनी करुन क्षमा याचना करावी व सर्वांचे सुखाची विनंती करुन घरी परत यावे. तेथून आलेवर घरात रोज तिची पोथी, पारायण, स्तुती, मंत्रजप, दोन्हीवेळा आरती करावी त्याने ती कायम आपलेवर प्रसन्न राहील.