तेहरान- पाकिस्तानचे ‘ग्वादार’ बंदर विकसित करून हिंदी महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या चीनच्या नीतीला भारताने इराणच्या मदतीने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. तब्बल 13 वर्षे रखडलेला चाबहार बंदर विकास करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर प्रत्यक्षात आला आहे. पंतप्रधान मोदी व इराणचे राष्ट्रपती हसन रोहानी यांनी सोमवारी संयुक्त निवेदनाद्वारे या ऐतिहासिक कराराची घोषणा केली.
इराणशी झालेल्या करारानुसार, चाबहार बंदर विकसित करण्यासाठी भारत इराणमध्ये तब्बल 500 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
* भारताकडून इराणला 50 कोटी डॉलरची मदत
* 13 वर्षापासून चाबहार बंदर करारासाठी भारत प्रत्नशील
* चाबहारला रस्ता व रेल्वेमार्गाने अङ्खगाणला जोडणचा प्रस्ताव
* भारत, इराण आणि अफगाण यांच्यात त्रिपक्षी करार
भारत व इराण या दोन्ही देशांचा इतिहास जितका जुना आहे; तितकीच जुनी त्यांची मैत्री असल्याचे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले.
आपल्या भाषणाची सुरुवात प्रसिद्ध उर्दू कवी मिर्झा गालिब यांच्या एका शेरने केलेल्या मोदी यांनी छाबहारमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी झालेला करार हा एक मैलाचा दगड असल्याची भूमिका व्यक्त केली. मोदी हा शेर म्हणत असताना इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी हे मंद स्मित करत होते.