Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रियकराला प्रपोज करताना पाय घसरून 100 फूट उंच टेकडीवरून पडून तरुणीचा मृत्यू

death
, बुधवार, 26 जुलै 2023 (07:15 IST)
तुर्कियेतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेचा साखरपुड्यानंतर लगेचच मृत्यू झाला. खरं तर, 39 वर्षीय येसिम डेमिर तिच्या साखरपुड्या नंतर लगेचच 100 फूट खाली कोसळून तिचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 6 जुलै रोजी उत्तर-पश्चिम तुर्कीमधील पोलांटे केप येथे ती महिला तिचा प्रियकर निझामेटिन गुर्सूसोबत तिची एंगेजमेंट साजरी करत होती तेव्हा ती एका टेकडीवरून पडली.
 
 मिळालेल्या माहितीनुसार, गुर्सूने  डेमिरला लग्नासाठी प्रपोज केले.दोघांनी त्याच दिवशी साखरपुडा केला आणि मग ठरवलं की हा दिवस खास करायचा. त्यांनी सूर्य मावळत असताना खाण्यापिण्याचा बेत आखला . यामुळे दोघेही तुर्कीतील पोलांट केप येथे पोहोचले. गुरसू सामान घेण्यासाठी गाडीकडे परतत असताना अचानक त्याला किंचाळण्याचा आवाज आला. तो पुन्हा कड्याच्या टोकाकडे धावला आणि त्याने त्याची प्रेयसी टेकडीवरून खाली पडताना दिसली.
 
डेमिर टेकडी वरून 100 फूट खाली पडली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, नंतर दुखापतीं मुळे तिचा मृत्यू झाला. गुर्सूने प्रसारमाध्यमांना सांगितले की, ही जागा रोमँटिक असेल, असे मला वाटल्याने त्यांनी ही जागा निवडली. त्याने सांगितले की दोघांनी दारू प्यायली होती. त्यामुळेच बहुधा तिचा तोल गेला आणि ती पडली असावी.
 
डेमिरचे मित्र म्हणतात की ही अशी जागा आहे जिथे प्रत्येकजण येतो आणि सूर्यास्त पाहतो. मात्र, रस्ते अतिशय खराब आहेत आणि डोंगराच्या बाजूला कोणतीही खबरदारी नाही. येथे एक रेषा काढणे आवश्यक आहे.
 




Edited by - Priya Dixit   
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sakshi Dhoni: महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीचे चित्रपटात लवकरच पदार्पण