Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुत्र्याने मटण खाल्ले म्हणून पित्याकडून पोटच्या मुलीची हत्या

murder
, मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (12:27 IST)
कुत्र्याने मटण खाल्ल्याने मुलीवर गावठी रिव्हॉल्व्हरने गोळी झाडल्याचा प्रकार तुळजापूरमध्ये उघडकीस आला आहे. या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना कार्ला येथे घडली आहे. 
 
तुळजापूर तालुक्यातील गणेश झंपण भोसले व मिराबाई गणेश भोसले या दोघा पती- पत्नींनी रविवारी त्यांची मुलगी काजल मनोज शिंदे (वय 22) वर्षे हिस कुत्र्याने मटण खाल्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. त्यानंतर पित्याने त्यांच्याजवळील गावठी रिव्हॉल्व्हरने पोटच्या मुलीला गोळी झाडली. यामध्ये काजल गंभीररित्या जखमी झाली.
 
हा प्रकार समजल्यानंतर काजलचे नातेवाईकांनी तिला तुळजापुर उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात असताना काजलचा मृत्यू झाला.
 
या प्रकरणात पोलीस ठाण्यात मयत तरुणीच्या आई वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

42 वर्षीय डिलिव्हरी बॉयने 19 वर्षाच्या मुलीला बळजबरीने किस केले, म्हणाला- मी तुझ्या काकासारखा