काय कोणताही माणूस मगरासोबत विवाह करू शकतो? बहुतेक आपलं उत्तर नाही असेच असेल, परंतू अलीकडेच एका महापौराने मगरासोबत लग्न केले आहे. होय, हे खरं आहे. मेक्सिकोच्या सॅन पेद्रो हुआमेलुला येथील महापौर व्हिक्टर एगुइलर यांच्या विवाहाची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर लोकं हे वाचून हैराण आहेत.
विशेष म्हणजे हे लग्न अगदी पद्धतशीर लावले गेले. लग्नात मगराला नववधूप्रमाणे तयार करण्यात आले. तिला तेथील परंपरेनुसार पांढरा गाऊन घातला गेला. तिला डोक्यावर फुलांचे क्राउन ठेवण्यात आले. इकडे मेयरही नवरदेवाप्रमाणे तयार झाले होते. विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात लोकं सामील झाले. वाजंत्री, बँड आणि वराती सर्वांसोबत महापौर लग्नासाठी पोहचले होते. येथे पाहुण्यांना स्वादिष्ट भोजनासह येथील पारंपरिक मदिरादेखील सर्व्ह करण्यात आली.
आता हे सर्व घडताना प्रश्न हा पडला की स्वत: महापौर यांना का म्हणून मगरासोबत लग्न करावे लागले. तर चला आपली जिज्ञासा शांत करू या. मेक्सिको येथील मासोळ्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे. येथे 200 वर्ष जुनी मान्यता आहे की मगरासोबत विवाह केल्यास समुद्रात मासे आणि सी फूड यांच्यात संख्येत वाढ होते आणि लोकांना फायदाही होतो. अशात तेथील महापौर यांना मगरासोबत विवाह करण्याची परंपरा निभवावी लागते.
येथे राहणार्या लोकांप्रमाणे मगर एक राजकुमारी आहे आणि त्यासोबत प्रेम आणि विवाहाने येथील समुद्रात मासे येतील. हे लग्न मेक्सिकन रीती भाती प्रमाणे केले गेले. लग्न सोहळ्यात आतिषबाजी, नृत्य, लोकनृत्य असे दृश्यही बघायला मिळाले.