पोकेमॉन गो या गेमने काही महिन्यांपूर्वी जगाचे लक्ष वेधले होते.
आता या गेमवर संशोधकांनी विस्तृत संशोधन अहवाल सादर केला आहे. पालकांनी मुलांसोबत यात सहभाग घेतल्यास नाते दृढ होण्यास मदत होते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी हा पर्याय उत्कृष्ट आहे, असे वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.
कुटुंबासोबत या गेमचा आनंद लुटणाऱ्या पालकांच्या मुलाखती संशोधकांनी घेतल्या. संवाद आणि स्मार्टफोनचा वापर कुटुंबासाठी करण्याची संधी या गेमने उपलब्ध करून दिली आहे.
टीव्हीसमोर बसून राहण्यापेक्षा मुलांसोबत हा गेम खेळणे अधिक चांगले, असे मत अनेक पालकांनी यासंबंधीच्या सर्वेक्षणात नोंदवले. पोकेमॉन गोमुळे वेळेचे नियोजन वेळेच्या सेटिंगमुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही.