Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खेळ भावनेवर आश्विनला व्याख्यान देण्याचा बीसीसीआयचा हेतू नाही

खेळ भावनेवर आश्विनला व्याख्यान देण्याचा बीसीसीआयचा हेतू नाही
, बुधवार, 27 मार्च 2019 (12:27 IST)
भा0रतीय क्रिकेट बोर्डाचे एका वरिष्ठ अधिकार्‍यने म्हटले की आयपीएल सामन्यात जोस बटलरला मांकडिग करून विवादांना जन्म देणार्‍या आर आश्विनला 'खेळ भावना' वर बोर्ड कोणतेही व्याख्यान देणार नाही. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले, आश्विनला खेळ भावनेवर व्याख्यानाचा प्रश्न उद्भवतच नाही. त्याने जे काय केले, हे नियमांच्या मर्यादेत होते. अंपायर आणि आणि मॅच रेफरी तेथे होते ज्यांचे काम याची खात्री करून आहे की सामना नियम मर्यादेत खेळला जाईल. ते म्हणाले, बीसीसीआय यात अडकू इच्छित नाही. जोपर्यंत शेन वॉर्नचा संबंध आहे तो राजस्थान रॉयल्सचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या प्रकरणात तो तटस्थ नाही. 
 
आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे ठरविले होते की आयपीएलमध्ये कोणीही मांकडिग करणार नाही. अधिकारी म्हणाले, मला माहीत आहे की शुक्लाजी कोणत्या बैठकीबद्दल बोलत आहे. हे नवीन नियम येण्याआधीची गोष्ट आहे ज्यात म्हटले गेले होते की मांकडिग करण्यापूर्वी फलंदाजांना चेतावणी देणे आवश्यक आहे. हे ठरविले होते की गोलंदाज किमान फलंदाजांना चेतावणी नक्कीच देतील. 
 
हे विचारल्यावर की धोनीने असे केले असते तर? ते म्हणाले, तो ते कधीच असे करणार नाही, पण यामुळे काय आश्विन चुकीचा ठरला? त्याला नियमांची बरीच माहिती आहे आणि तो नेहमी दोषांचा फायदा उचलेल. यात काहीच करू शकत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान मोदींचे ट्वीट, थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार