Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

तो' एपिसोड ‘हॉटस्टार’वरून काढून टाकला

hotstar
, शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (19:46 IST)
‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध चॅट शोचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलचा नुकताच प्रसारित झालेला एपिसोड ‘हॉटस्टार’वरून काढून टाकण्यात आला आहे. हार्दिक आणि लोकेश राहुल या दोघांनी शोमध्ये महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोघांवर प्रचंड टीका झाली. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता ‘कॉफी विथ करण शो’चा ऑनलाइन स्ट्रिमिंग पार्टनर ‘हॉटस्टार’वरून तो एपिसोड काढून टाकण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर ‘स्टार वर्ल्ड’ या वाहिनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या शोचे सर्व टीझर आणि फोटो काढून टाकले आहेत.
 
 
 
सोशल मीडियावर टिकेचा होणारा भडीमार पाहता हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर माफी मागितली होती. सर्वांची माफी मागत, महिला वर्गाचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिला मुख्यमंत्री झाली की प्रश्न सुटतील असे नाही