महाराष्ट्र राज्याची महिला मुख्यमंत्री झाली म्हणजे महिलांचे प्रश्न सुटतील असे नाही तर मुख्यमंत्री पुरुष असो किंवा महिला सर्व जनतेचे प्रश्न सुटणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी महिला असतानाही संबंधित राज्य छेडछाड मुक्त होऊ शकले नसल्याचा दाखलाही त्यांनी दिला. मी महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होईल की नाही हा नंतरचा भाग आहे. तुर्त तरी मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बारामती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मागितलेली आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.