इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. दुहेरी हेडरच्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने असतील. कोलकात्याच्या संघाला विजयाची हॅट्ट्रिक साधायची आहे, तर दिल्लीच्या संघाला सलग दोन पराभवानंतर विजयाच्या रथावर स्वार व्हायचे आहे. केकेआर गुणतालिकेत अव्वल, तर दिल्लीचा संघ सातव्या स्थानावर आहे.
रविवार, 10 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकाता आणि दिल्ली यांच्यातील हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.
कोलकाता आणि दिल्ली सामन्यात नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता, तर पहिला चेंडू 3.30 वाजता टाकला जाईल. कोलकाता आणि दिल्ली सामन्यांचे प्रसारण हक्क स्टार नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरही या सामन्याचे प्रसारण होणार आहे. स्टार स्पोर्ट्स चॅनलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट सामने पाहू शकता.
:
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन-
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (क), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन-
पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर , रोवमन पॉवेल, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेट किपर), सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, एनरिक नॉर्टजे