Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रेनमध्ये भोक पाडून लावणार कॉम्प्युटर चिप

ब्रेनमध्ये भोक पाडून लावणार कॉम्प्युटर चिप
, बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (12:38 IST)
न्यूरालिंक कंपनीची स्थापना करणारे एलन मस्कने सांगितले की एका वर्षाच्या आत मानवी मेंदूमध्ये लावली जाणारी कॉम्प्युटर चिप तयार केली जाईल. ती चिप ब्रेनमध्ये फिट करण्यात येईल. ज्याने ब्रेन थेट कॉम्प्युटरसोबत जोडले जाईल. सध्या ही कंपनी अल्ट्रा हाय बॅडविथ ब्रेन मशीन इंटरफेस तयार करण्यात व्यस्त आहे.
 
मस्क म्हणाले की हे चिप लावण्याचे काम रोबोटद्वारे केले जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने मनुष्यांवर कंट्रोल मिळवू नये यासाठी मानवी मेंदू कॉम्प्युटरसोबत जोडणे गरजेचे आहे. 
 
या प्रकारे जोडता येईल
मानवी मेंदूतून एक तुकडा काढून रोबोटच्या मदतीने इलेक्ट्रोड्स मेंदूत टाकला जाईल आणि छिद्रात डिव्हाईस लावलं जाईल. याने डोक्यावर एक लहान डाग दिसेल. न्यूरालिंक तयार करत असलेली ही थ्रेड मनुष्याच्या केसाच्या दहाव्या भागाऐवढी पातळ असेल. ही थ्रेड ब्रेन इंज्युरीवर उपचार करण्याचे काम करेल. मस्क यांच्या प्रमाणे एका वर्षाच्या आत हे मनुष्याच्या मेंदूत लावली जाऊ शकेल. हे डिव्हाईस 1 इंची असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Live Updates : केजरीवाल यांनी अटक केलेल्या 115 शेतकर्‍यांची यादी, दिल्ली पोलिस दंगलींचा शोध घेत आहेत