यूजर्सला नेहमी सतावणारी भीती असते ती स्मार्टफोनची स्क्रीन तुटण्याची. हे हेरत कॉर्निंग कंपनीने गोरिल्ला ग्लास बनवले. आता हे ग्लास अॅपल, सॅमसंग, एलजीसह अन्य कंपन्याही वापरतात. मागील दोन वर्षात कॉर्निंगने या ग्लासच्या तंत्रज्ञानाच्या गुणवत्तेत अनेक पटीने सुधारणा केली आहे. नुकतीच कंपनीने गोरिल्ला ग्लास 6 ची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे ही ग्लास 1 मीटरच्या उंचीवरुन 15 वेळा पडला तरी मोबाइल स्क्रीनला धक्का सुद्धा लागणार नाही.
सध्या ही ग्लास कोणत्या मोबाइल्समध्ये वापरण्यात येणार यावर कंपनीने माहिती दिलेली नाही. 2019 मध्ये मोबाइल्सच्या टॉप मॉडेल्सला गोरिल्लाग्लास 6 चे प्रोटेक्शन असणार आहे.
ही ग्लास सध्या मोबाइलमध्ये वापरण्यात येत असलेल्या गोरिल्ला ग्लास 5 पेक्षाही दुप्पट टिकाऊ आहे, असा दावा कंपनीने केला आहे. ग्राहकांचा मोबाइल साधारणतः एका वर्षातून 7 वेळा पडू शकतो आणि या दरम्यान उंची जवळपास 1 मीटरची असते. त्यामुळे गोरिल्ला ग्लास 6 स्क्रीनचे नुकसान होण्यापासून वाचवू शकते, असे कंपनीने सांगितले आहे.
स्मार्टफोन पडल्यानंतर स्क्रीनचे नुकसान होते. स्क्रीनला तुटण्यापासून वाचवण्यासाठी लावण्यात येणार्या काचेला गोरिल्ला ग्लास म्हणतात. साधारण भाषेत तुम्ही याला डिस्प्लेच्यावर लागलेली ग्लासही म्हणू शकता.