ट्वीट करणे म्हणजे विचार करत फार म्हणजेच १४० शब्द वापरने होय. यामुळे अनेक नाराज सुद्धा होतात. ही घरज ओळखून आता ट्वीटर मोठा बदल करणार आहे.
फेसबुक म्हणजे सर्व सांगायचंय ते सर्व कितीही शब्दात आपण सांगत असतो. अनेक फोटो वापरुन शेअर करण्याचं व्यासपीठ त्या उलट ट्विटर म्हणजे ‘140 कॅरेक्टर्स लिमिट’ आहे. मात्र आता स्वतः ट्विटर ही 140 कॅरेक्टर्स’ची ओळख आता पुसणार आहे.
ट्विटरच्या ‘What’s happening’च्या स्पेसमध्ये केवळ 140 कॅरेक्टर्समध्येच आपण काहीही लिहू शकतो. यापुढे व्यक्त होण्यासाठी कॅरेक्टर्स मर्यादा वाढवण्यात येणार आहे. हो आता ट्वीट करतांना आपण आता 140 वरुन 280 कॅरेक्टर्स म्हणजे आताच्या संख्येच्या बरोबर दुप्पट कॅरेक्टर वापरता येणार आहे. ट्विटरकडून या सर्व गोष्टींचे प्रयोग अर्थात टेस्टिंग सुरु करण्यात आले आहे. यामध्ये टेस्टिंगबाबत माहिती देण्यासाठी एक ट्विट केला आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी 220-225 कॅरेक्टर्स वापरले आहेत.