Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

हार्दिक पटेलला भर सभेत मारले हे आहे खरे कारण

hardik patel
, शनिवार, 20 एप्रिल 2019 (07:13 IST)
गुजरात येथे भर प्रचार  सभेत काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या कानशिलात लगावली घटना घडली आहे. या सर्व प्रकारामुळे  सभेत चांगलाच गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात हार्दिकला कानशिलात लगावण्यामागचे नेमके कारण काय ? चर्चेला ऊत आला होता. मात्र त्या मारणाऱ्या अज्ञात व्यक्तीने उलट सुलट सुरू असलेल्या चर्चेला पुर्णविराम देत कानशिलात लगावण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. 
 
कानाखाली मारणाऱ्या या  व्यक्तीचे नाव तरूण गज्जर असे असून,  गज्जर याने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, जेव्हा पाटीदार समाजाचे आंदोलन गुजरात येथे  सुरू होते. त्यावेळी माझी पत्नी गर्भवती होती. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असतांना, पाटीदार समाजाच्या सुरू असणाऱ्या आंदोलनामुळे मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्याचवेळी मी हार्दिकला मारण्याचा निर्णय घेतला होता. मला त्याला कोणत्याही परिस्थितीत धडा शिकवायचा होता. म्हणून भर सभेत त्याच्या कानशिलात लगावली. गज्जर पुढे म्हणाला की, जेव्हा अहमदाबाद येथे मेळावा सुरू होता त्यावेळी मी माझ्या मुलासाठी औषधे घेण्यास बाहेर गेलो,  त्यावेळी सुरक्षा म्हणून सर्व दुकाने बंद ठेवली होती. मात्र हे सर्व बंद असण्या मागे हार्दिकचा हात होता. तो पाहिजे तेव्हा गुजरात बंद करण्याचे आदेश देत असतो. तो गुजरातचा हिटलर आहे. स्वतःला काय समजतो? असा संतप्त सवालदेखील गज्जर यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. त्यामुळे हार्दीकला का मारले आता समोर आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल अपशब्द ‘आयपीएस असोसिएशन’ने प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्याचा निषेध