लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी फेरविचार याचिकेबाबत विरोधकांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून एकाच याचिकेवर किती वेळा सुनावणी घ्यायची, अशा शब्दात याचिकाकर्त्यांना फटकारले आहे.
टीडीपी नेता चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विरोधकांना धक्का बसला आहे.