Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'गुगल' मध्ये युवकांना नोकरीची संधी

'गुगल' मध्ये  युवकांना नोकरीची संधी
, गुरूवार, 22 मार्च 2018 (09:29 IST)

गुगल आता पदवीधर युवकांना नोकरी देणार आहे. टेक्निकल आणि सेल्स-मार्केटिंगमध्ये नोकरीची संधी गुगल देत आहे. गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी पदवीधर असणं आवश्यक आहे. शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकणारे विद्यार्थीही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. भारतातून निवड झालेल्या उमेदवारांना गुरुग्राममध्ये जाऊन नोकरी करावी लागेल. फ्रेश आयडिया, इंफॉरमेशन रिट्रायव्हल, डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग, लार्ज स्केल सिस्टिम डिझाईन, नेटवर्किंग अॅण्ड डेटा स्टोरेज असणाऱ्यांना गुगल नोकरी देणार आहे.

सेल्स अॅण्ड अकाऊंट मॅनेजमेंट पदासाठी साठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीए/ बीएएसची पदवी किंवा त्या योग्यतेची पदवी, IaaS किंवा PaaS प्रॉडक्टमध्ये काम करण्याचा २ वर्षांचा अनुभव, इंग्लिश बोलणं आणि लिहिणं आलं पाहिजे, टेक्निकल/ सेल्स इंजिनिअरिंगमध्ये अनुभव, सीआरएम सिस्टिममध्ये अनुभव, क्लाऊड कॉम्प्युटिंग मार्केट आणि टेक्नोलॉजीचा समज, गुगल क्लाऊड प्रोडक्टची माहिती असावी. 


दुसरी जागा सॉफ्टवेअर इंजिनिअर ची असून यासाठी  मान्यताप्राप्त विद्यापीठातून कंप्युटर सायन्समध्ये बीए/बीएस पदवी किंवा त्या योग्यतेची पदवी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा अनुभव, वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, Unix/Linux environments, मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, नेटवर्किंग डेव्हलपिंग लार्ज सॉफ्टवेअर सिस्टिमचा अनुभव इंग्लिश बोलणं आणि लिहिणं आलं पाहिजे, मास्टर्स, पीएचडी, किंवा कोणत्याही टेक्निकल फील्डचा अनुभव, यातल्या एकाचा अनुभव : Java, C/C++, C#, Objective C, Python, JavaScript, or Go, दुसरी को़डिंग भाषा शिकण्याची योग्यता हवी. याबाबतची अधिक माहिती www.careers.google.com या वेबसाईटवर मिळू शकते. तसंच या वेबसाईटवरूनच नोकरीसाठी अर्जही करता येणार आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जगातील शेवटच्या पांढ-या नर गेंड्याचा मृत्यू