Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतकर्‍याने बांधले मोदींचे मंदिर, खर्च केले सव्वा लाख रुपये

शेतकर्‍याने बांधले मोदींचे मंदिर, खर्च केले सव्वा लाख रुपये
, गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (11:39 IST)
तामिळनाडूमधील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक मंदिर बांधले आहे. 50 वर्षीय शंकर त्रिची जिल्ह्याच्या इराकुडी गावातील रहिवासी आहे. त्याने या मंदिरासाठी एक लाख २० हजार रुपयांचा खर्च स्वत: केला आहे.
 
शंकर यांनी आपल्या शेतावर मंदिर बांधले असून रोज सकाळी पूजा करतात आणि मंत्र देखील वाचातत. मोदी हे देव असून भारताचा विकास करण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे, असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे.
 
भाजप कार्यकर्ता असणाऱ्या पी. शंकर यांनी मोदींवरील प्रेमापोटी आपण हे मंदिर बांधल्याचे म्हटलं आहे. हे मंदिर आता पंचक्रोषीमध्ये ‘नमो मंदिर’ नावाने लोकप्रिय झालं आहे. आजूबाजूच्या गावांमधून अनेकजण या मंदिरामध्ये असणाऱ्या मोदींच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले आहेत. 
 
मोदींनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं असं वाटतं असताना त्यांनी हे मंदिर बांधण्याचं ठरवलं. मोदींनी शेतकऱ्यांसाठी बरीच कामं केली आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. यामुळे त्यांच्याबद्दल प्रेम आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी मी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. असं शंकर सांगतात. 
 
2014 पासूनच मंदिर बांधण्याची इच्छा होती परंतू काही कारणास्तव ते तेव्हा शक्य झशले नाही परंतू आता त्यांनी शेतामध्ये एक छोटे मंदिर बांधले. यात ठेवण्यात आलेली पीएम यांची मूर्ती 2 फीट ऊंच आहे. पांढरा कुर्ता आणि निळं जॅकेट परिधान केलेली ही मूर्ती आहे.  
 
तामिळनाडूची माजी मुख्यमंत्री जे जयललिता, सीएम पलानीसामी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फोटो देखील मंदिराच्या भींतीवर लावण्यात आले आहे.
 
हे संपूर्ण मंदिर शंकर यांनी स्वखर्चाने बांधले आहे. हे मंदिर उभारण्यासाठी त्यांनी एक लाख 20 हजार रुपये खर्च केले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमृता फडणवीस : राजकारण्यांच्या बायकोची इमेज बदलणाऱ्या 'मिसेस मुख्यमंत्री'