Publish Date: Fri, 21 Sep 2018 (16:05 IST)
Updated Date: Fri, 21 Sep 2018 (16:14 IST)
क्रिकेटपटू विराट कोहली लवकरच एका फील्डमध्ये डेब्यू करणार आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. कोहलीने Trailer the Movie करता आपला लूक ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अॅक्शन अवतारात दिसणार आहे.
पोस्टर शेअर करता विराट म्हणाला की, nother debut after 10 years, can't wait! #TrailerTheMovie http://www.trailerthemovie.com या पोस्टरवर एक रिलीज डेट दिली आहे. हा डेब्यू कोणत्या सिनेमाचा नाही तर तर विराट कोहली आपल्या ब्रँड करता डेब्यू करत आहे. विराट wrogn.in च्या बॅनर अंतर्गत क्लोथिंग ब्रँडची सुरूवात करत आहे. wrogn विराट कोहलीच्या वॉर्डरोलमधून इंस्पायर्ड क्लोथ विकतो. आता विराट trailerthemovie.com मधून आऊटफिट्स विकणार आहे. या वेबसाइटचं लाँचिंग 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.