Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलाने मोबाईल गेम खेळतांना वडिलांच्या अकाऊंटमधील तब्बल 35 हजारु उडवले

मुलाने मोबाईल गेम खेळतांना वडिलांच्या अकाऊंटमधील तब्बल 35 हजारु उडवले
उत्तर प्रदेशातील एका 10 वर्षीय मुलग मोबाईल गेम खेळत असताना त्याला नवीन हत्यार घेण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने थेट आपल्या वडिलांच्या अकाऊंटमधील तब्बल 35 हजारु रुपये उडवले आहेत. बँक अकाऊंटमधील पैसे उडत असल्याने मुलाच्या वडिलांनी पोलिसांना कळवले. पोलिसांच्या सायबर सेलने तातडीने याचा शोध घेतल्यानंतर मुलानेच गेम खेळताना पैसे उडवल्याचे समोर आलं आहे.
 
हा मुलगा पाचवीमध्ये शिकत आहे. त्याला ‘फ्री फायर’ नावाच्या गेमची सवय लागली आहे. यावेळी मुलाने वडिलांच्या फोनमध्ये पेटीएम अकाऊंट बनवले. जेव्हा गरज असेल तेव्हा मुलाने पैसे ट्रान्सफर करुन घेतले. वडिलांनी जेव्हा आपल्या खात्याचे स्टेटमेंट काढले तेव्हा त्यांना धक्का बसला. सायबर सेलमध्ये त्यांनी तक्रार केली तेव्हा समजले की, ज्या नंबरवर पैसे ट्रान्सफर झाले आहे तो त्यांचाच नंबर आहे. सायबर सेलने जेव्हा मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने याची कबुली दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुन्हा एकदा ‘उत्कृष्ट संसदपटू’