Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन राजकीय समीकरण ? संदीप देशपांडेंनी पवार यांची घेतली भेट

नवीन राजकीय समीकरण ?  संदीप देशपांडेंनी पवार यांची घेतली भेट
, बुधवार, 30 ऑक्टोबर 2019 (15:19 IST)
मुंबईतील माहीम मतदारसंघामधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले मनसेचे नेते आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या कार्यपद्धतीने आपण प्रभावित झालो असून आपल्याला त्यांची भेट घेण्याची इच्छा असल्याचं देशपांडे यांनी सांगितल्यानंतर ही खास भेट झाली. 
 
यावेळी संदीप देशपांडे यांनी बुधवारी सकाळी मुंबईतील पवार यांच्या निवासस्थानी म्हणजेच ‘सिल्व्हर ओक’ येथे जाऊन त्यांची भेट घेतली. जवळजवळ अर्धा तास झालेल्या या भेटीमध्ये दोघांनी राजकीय विषयांवर चर्चा केली. विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगिरीबद्दलची माहिती देशपांडे यांनी पवारांना दिली. यानंतर पुढील आठवडाभरामध्ये पवार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेनेनं बोलावली तातडीची बैठक, आदित्य ठाकरेंचा दौराही रद्द