Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Hair Spa at Home दिवाळीत केसांना सॉफ्ट आणि सिल्की करायचे असेल तर झटपट ही हेअर स्पा ट्रीटमेंट 4 स्टेप्समध्ये घ्या

Hair Spa at Home दिवाळीत केसांना सॉफ्ट आणि सिल्की करायचे असेल तर  झटपट ही  हेअर स्पा ट्रीटमेंट 4 स्टेप्समध्ये घ्या
, शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (16:36 IST)
Hair Spa Steps at Home जर तुम्हाला दिवाळीत तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवायचे असतील, तर तुम्हाला यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, तर तुम्ही घरी राहूनच तुमचे केस पार्लरसारखे बाऊन्सी करू शकता. यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. या पद्धतींचा अवलंब करण्यापूर्वी, हे चांगले जाणून घ्या की तुम्हाला केस धुल्यानंतरच या टीप्स अमलात आणाव्या लागतील. ही पद्धत तेलकट केसांवर काम करणार नाहीत. चला, जाणून घ्या हेअर स्पा कसा करायचा-
 
प्रथम केसांना तेल लावा  
सर्व प्रथम, आपण केसांवर चंपी द्यावी. यामुळे तुमच्या केसांचे पोषण होईल. केसांमध्ये तेल 40 मिनिटे राहू द्यावे लागेल. यानंतर केस शॅम्पूने धुवा.
 
आता केसांवर हेअर मास्क लावा  
हेअर मास्क बनवण्यासाठी केळी आणि कोरफडीचे जेल मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. यानंतर हे मिश्रण डोक्याला लावा. हा हेअर मास्क तुम्ही टाळूवरही लावू शकता.
 
स्टीम घ्या  
केसांना स्टीम करणे फारच गरजेचे आहे.  तुम्हाला हा हेअर मास्क लावायचा आहे आणि गरम पाण्यात टॉवेल बुडवून तो पिळून केसांना गुंडाळा. 5-10 मिनिटे गुंडाळून ठेवा. त्यानंतर शॅम्पूने धुवा.
 
एलोवेरा जेल 
तुम्हाला कंडिशनर वापरण्याची गरज नाही, तर शॅम्पू केल्यानंतर केसांच्या लांबीवर एलोवेरा जेल लावावे लागेल. आता दोन मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर धुवा.
Edited by : Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Beauty benefits of buttermilk : ब्युटी रूटीनमध्ये ताक समाविष्ट करा, ताकाचे फायदे जाणून घ्या