Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Skin Whitening Face Pack: बटाटा आणि तांदळाचा फेसपॅक लावा त्वचेवर चमक मिळवा

Skin Whitening Face Pack:  बटाटा आणि तांदळाचा फेसपॅक लावा त्वचेवर चमक मिळवा
, गुरूवार, 22 ऑगस्ट 2024 (08:32 IST)
Skin Whitening Potato Face Pack: तांदूळ कोरियन त्वचेच्या काळजी घेण्यासाठी  मोठ्या प्रमाणात वापरला जातो.त्यामुळे त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते. यासोबतच यामध्ये वापरण्यात आलेला बटाटा त्वचेसाठी चमत्कारही करू शकतो. त्वचा उजळण्यासाठी हे घरगुती फेस पॅक लावा आणि त्वचेची चमक वाढवा. 
चला तर मग हा फेसपॅक कसा बनवायचा हे जाणून घेऊ या.
 
साहित्य -
बटाटा, तांदळाचे पीठ,मध, हळद घ्या 
 
कसे बनवायाचे -
हे पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम  बटाटे चांगले धुवा.नंतर किसून घ्या.बटाटे किसून झाल्यावर सुती कापड घ्या.हे कापड एका भांड्यात ठेवून त्यावर किसलेला बटाटा ठेवा.आणि त्याला घट्ट बांधून घ्या हाताच्या मदतीने सर्व रस पिळून घ्या. 
 
आता त्यात तांदळाचे पीठ घाला.(तांदळाचे पीठ नसेल तर झटपट बनवू शकता. त्यासाठी ब्लेंडरमध्ये तांदूळ टाकून त्याची बारीक पावडर बनवा.) आता या मिश्रणात मध आणि चिमूटभर हळद घाला.चांगले मिसळा.त्वचा गोरी करणारा फेस पॅक तयार आहे.
 
 कसा लावावा -
चेहऱ्यावर फेस पॅकचा चांगला परिणाम हवा असेल तर त्वचा व्यवस्थित स्वच्छ करा. यासाठी तुम्ही तुमचा आवडता फेसवॉश वापरू शकता.
चेहरा धुतल्यानंतर कोरडा करा.त्यानंतर तुमचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटे थांबा.
पॅक सुकल्यावर चेहरा स्वच्छ करण्यासाठी ओल्या सुती कापडाचा वापर करा.
हे आठवड्यातून 1 ते 2 वेळा केले जाऊ शकते.
आपला चेहरा स्वच्छ केल्यानंतर, आपले आवडते मॉइश्चरायझर किंवा सीरम लावा. 
 
 
 
Edited By - Priya Dixit 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उपवास स्पेशल : साबुदाणा क्रिस्पी फ्रेंच फ्राईज