Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिवाळ्यात ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी या टिप्स अवलंबवा

How to maintain the beauty of your lips in winter
, शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 (00:30 IST)
सुंदर ओठ सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मऊ, नाजूक, गुलाबी ओठांना थंडीत विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात ओठांची काळजी कशी घ्यावी चला काही टिप्स जाणून घेऊ या.
ऑलिव्ह ऑईल आणि व्हॅसलीन मिक्स करून दिवसातून तीन ते चार वेळा फाटलेल्या ओठांवर लावा. तीन ते चार दिवसांच्या नियमित उपचारानंतर, आपल्या ओठांतील भेगा बऱ्या होऊ लागतात किंवा भरून येतात.
ओठ फुटले असतील तर थोडे मध घेऊन बोटाने ओठांवर हलक्या हाताने चोळा. फक्त काही दिवसांच्या प्रयत्नाने तुमचे ओठ पूर्वीसारखे चमकदार आणि मऊ होतील.
दोन चमचे कोको बटर, अर्धा चमचा मध मेण घ्या. उकळत्या पाण्यात एका भांड्यात मेण वितळवा. त्यात कोको बटर घाला. आता हे मिश्रण थंड होऊ द्या. लिप ब्रशच्या मदतीने ते ओठांवर लावा. यामुळे ओठांचे सौंदर्य टिकून राहील.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिवाळ्यात काकडी खाणे फायदेशीर आहे की हानिकारक?