Bank Holiday In October: सप्टेंबर प्रमाणे ऑक्टोबर मध्ये देखील सण आहे. या महिन्यांत एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहे. बँकांना कधी सुट्टी आहे जाणून घ्या.
ऑक्टोबर महिन्यांत गांधी जयंती, नवरात्री, दसरा, करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी सण आहे. ऑक्टोबर महिन्यांत एकूण 12 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहे. या सुट्ट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश असून चार रविवार देखील आहे. रविवारी बँकांना सुट्टी असते.
ऑक्टोबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची सम्पूर्ण यादी पहा -
2 ऑक्टोबर 2024 रोजी बुधवार असून गांधी जयंती निमित्त बॅंकेला सुट्टी आहे.
3 ऑक्टोबर 2024 रोजी गुरुवार असून शारदीय नवरात्र प्रारंभ होत असून महाराजा अग्रसेन जयंतीची बँकांना सुट्टी आहे.
6 ऑक्टोबर 2024 रविवार असल्याने देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
10 ऑक्टोबर 2024 रोजी गुरुवार असून महासप्तमीनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
हेही वाचा- नियम बदल: तुम्ही UPI द्वारे 5 लाख रुपयांचे व्यवहार करू शकाल का? नवीन मर्यादा जाणून घ्या
11 ऑक्टोबर 2024 हा शुक्रवार असून महानवमीनिमित्त बँकेला सुट्टी असेल.
12 ऑक्टोबर 2024 रोजी शनिवार आहे. आयुधा पूजा, दसरा आणि दुसरा शनिवार निमित्त देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
13 ऑक्टोबर 2024 रोजी रविवार आहे. देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असते.
17 ऑक्टोबर 2024 रोजी गुरुवार आहे आणि काटी बिहू निमित्त आसाममध्ये बँका बंद राहतील. हा दिवस प्रगत दिवस (वाल्मिकी जयंती) देखील आहे, त्यामुळे देशातील इतर राज्यांमध्येही बँका बंद राहणार आहेत.
20 ऑक्टोबर 2024 रविवार असल्याने देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
26 ऑक्टोबर 2024 रोजी शनिवार आहे. विलय दिनानिमित्त जम्मू-काश्मीरमधील बँका बंद राहतील. तर महिन्यातील चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
27 ऑक्टोबर 2024 रविवार असल्याने देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
31 ऑक्टोबर 2024 रोजी नरक चतुर्दशी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन आणि दिवाळी आहे. देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.