लिवा बिरला सेल्युलोज बियाण्याच्या ग्रीन टॅगसह ग्राहकांना पर्यावरणात स्वतःचे योगदान देण्याचे आणि जागतिक टिकाऊ फॅशनचे भाग बनण्याची एक सुवर्ण संधी देत आहे.
टिकाऊ पर्यावरणाच्या दृष्टीने पाऊल उचलत, बिरला सेलूलोजच्या घटक ब्रँड लिवाने रोपे देणारी वस्त्रे (प्रत्येक कपड्याला बियाणे असलेला टॅग जोडलेला असून, रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध आहे) लाँच केली. पर्यावरण पूरक लिवाइको लॉन्च करण्याबरोबरच बिरला सेलूलोजने रोपे (बियाणे) देणारे टॅग कपड्यांसोबत देत आहे, त्याच सोबत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला कपड्याच्या निर्मितीपासून ते विघटनापर्यंतची माहिती देत पर्यावरण संवर्धनासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्राहकांमध्ये टिकाऊ आणि कायमस्वरूपी फॅशनविषयी जागरूकता म्हणून हा एक पुढाकार आहे. टॅग बियाणे आणि फायबरपासून तयार केला जातो जो बायोडिग्रेडेबल असतो. बियाणे ५ - ६ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर जमिनीत पेरण्यासाठी तयार होते आणि सूर्यप्रकाशात ठेवावे जेणेकरुन ते ५ -६ दिवसांत अंकुर येईल.
लिवाइको १००% जंगलातील टिकाऊ स्रोत, कमीतकमी पाण्याचा वापर, ग्रीन हाउस गॅस उत्सर्जन, वेगाने बायो-डीग्रेडिबिलिटी आणि इतर स्रोताचा शोध घेण्याद्वारे लिवाइको फ्लुएडीटी फॅशन वाढवत आहे. लिवाईको मुख्य हेतू म्हणजे भविष्यातील फॅशन सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांना इको-फ्रेंडली आणि टिकाऊ पद्धतींची माहिती करून देणे.
बिरला सेल्यूलोजचे विपणन व वरिष्ठ अध्यक्ष श्री. मनोहर सॅम्युअल म्हणाले, " लाखो तरुणांना सध्याच्या पर्यावरणाच्या स्थितीची जाणीव करून देणे उद्योगांसाठी आव्हानात्मक झाले आहे. आपण पर्यावरणाचा एक भाग असल्याने, प्रत्येक टप्प्यावर स्थिर आणि सजग राहण्यासाठी आपल्याला सर्व मूर्त आणि अमूर्त पैलूंवर काम करावे लागेल. आम्ही आमची नवीन आवृत्ती लिवाईको डब्ल्यू बरोबर लॉन्च करीत आहोत, ज्यामुळे ग्राहकांना टिकावू आणि उच्च फॅशन वर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, असा एक उत्कृष्ट कलेक्शन तयार केला आहे."