Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांदा पेटला, होणार अजून महाग, शेतकरी वर्गाने थांबवले लिलाव

कांदा पेटला, होणार अजून महाग, शेतकरी वर्गाने थांबवले लिलाव
, मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (10:33 IST)
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणणल्याने बाजारपेठेत कांद्याचे दर पडले आहे. याचे पडसाद कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये सोमवारी उमटले. कांद्याचे भाव घसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगावमध्ये लिलाव बंद पाडला. तसेच निफाडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरू केला आहे. विशेष म्हणजे लासल गाव सोबत, जिल्ह्यातील इतर बाजारपेठेत कांदा विक्री करणार नाही असा पवित्रा घेतला आहे. शेतकर्यांसोबत, या निर्णयाला व्यापारी वर्गाने सुद्धा तीव्र विरोध केला आहे.
 
दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको केला तर बाजार पेठेत विक्रीस आणलेला कांदा शेतकरी पुन्हा परत घेवून गेले आहे. जो पर्यंत निर्यात बंदी व इतर जाचक अटी सरकार काढणार नाही, व शेतकरी हिताचे निर्णय घेणार नाही तो पर्यंत बाजारात कांदा विक्री करणार नाही असा निर्धार शेतकरी वर्गाने घेतला असून, विशेष म्हणजे कोणतीही संघटना किंवा राजकीय पक्ष मागे उभा नसतांना हे तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.
 
देशातील कांद्याच्या वाढत्या दराना नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय रविवारी जारी केला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात पत्रकही जारी केले होते. कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ लागू केला असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले होते. त्यानंतर या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे बोलले जात होते. त्यांचे परिणाम सोमवारी दिसून आले आहेत.
 
कांद्याचे भाव घसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगावमध्ये लिलाव बंद पाडला. तसेच निफाडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरू केला आहे.देशातील कांद्याच्या वाढत्या दराना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय रविवारी जारी केला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात पत्रक जारी केले होते. कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ लागू केला असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले होते. त्यानंतर या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना असल्याचे बोलले जात होते. त्यांचे परिणाम सोमवारीच दिसून आले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नथुरामची स्तुती करणारे मुलाचे नाव नथुराम का ठेवत नाहीत?