Petrol Diesel Price Today 29 May2023 : सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट केले आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथील किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय स्तरावर सारखेच आहेत.
कच्च्या तेलात चढ-उतार सुरूच आहेत. सध्या ते प्रति बॅरल $75 च्या वर आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 77.59 आणि WTI क्रूड प्रति बॅरल $ 73.41 वर कायम आहे.
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62रुपये प्रति लिटर आहे.
कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नई : पेट्रोल 102.74 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात. यामध्ये कच्च्या तेलाची किंमत, वाहतूक खर्च आणि केंद्र आणि राज्य सरकारद्वारे आकारले जाणारे कर यांचा समावेश आहे.