Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उडीद आणि मूग उत्पादकाना अच्छे दिन येणार

उडीद आणि मूग उत्पादकाना अच्छे दिन येणार
, मंगळवार, 22 ऑगस्ट 2017 (09:23 IST)
केंद्र सरकारने उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उडीद आणि मूग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण आयात बंद झाल्यामुळे आता चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा आहे. उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध, कच्च्या आणि पक्क्या तेलावरील आयात शुल्क 5 आणि 7 टक्क्यांहून 15 आणि 25 टक्के केलं. तर तूर डाळीच्या आयातीवरही निर्बंध घातले आहेत.
 

उडीद आणि मुगाची आयात बंद झाल्याने भारतातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, कच्च्या आणि पक्क्या खाद्य तेलावरचं आयात शुल्क वाढवल्याने सोयाबीनचे बाजारातील दर वधारले आहेत. तूर डाळीची आयात बंद केल्याने तुरीचे दर 4 हजार 800 रुपये प्रती क्विंटलवर पोहोचले आहेत. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशपांडे यांनी रचलेली "अवयवदान प्रतिज्ञा" झाली अधिकृत प्रतिज्ञा