Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिलिंडरचे पैसे ऑनलाइन भरल्यास पाच रूपयांची सूट

सिलिंडरचे पैसे ऑनलाइन भरल्यास पाच रूपयांची सूट
देशाची अर्थव्यवस्था कॅशलेस करण्याचा विडा उचललेल्या मोदी सरकारने आता घरगुती सिलिंडरच्या ऑनलाइन पेमेंटवर पाच रूपयांची सूट जाहीर केली आहे. त्यानंतर आता तेल कंपन्यांकडून प्रत्येक घरगुती सिलिंडरची खरेदी आणि पैसे ऑनलाइन भरल्यास पाच रूपयांची सूट जाहीर करण्यात आली.
 
कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल भरणार्‍या ग्राहकांना 0.75 टक्के सूट देण्याचे आदेश सरकारने तेल कंपन्यांना दिले होते. त्यामध्ये आता एलपीजीची भर पडली आहे. सिलिंडरची रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना नेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्डचा पर्याय उपलब्ध आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुतळे उभारणी मला आवडत नाही - राज ठाकरे