Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘स्नॅपडील’ची ‘स्मार्ट’डील: कॅश अॅट सर्व्हिसद्वारे तुमच्या घरी पैसे मिळणार

‘स्नॅपडील’ची ‘स्मार्ट’डील: कॅश अॅट सर्व्हिसद्वारे तुमच्या घरी पैसे मिळणार
, शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (09:53 IST)
कंपनीकडे ऑर्डर केल्यानंतर वस्तू पोहोचवण्यात येते. त्याचे पैसे कॅश ऑन डिलिव्हरी घेतले जातात. पण आता ते पैसे कॅश अॅट सर्व्हिसच्या माध्यमातून ऑर्डरप्रमाणे पोहोचवले जाणार आहेत. पण एटीएमप्रमाणे अट लागू करण्यात आली आहे. तिथेही तुम्ही २००० हजार रुपयांपर्यंतच रोकड मागवू शकता. पैसै मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या एटीएम कार्डद्वारे ते पैसे कंपनीला देऊ शकता. त्यासाठी नोंदणीवेळी फ्री चार्ज अथवा डेबिट कार्डाद्वारे फक्त १ रुपया सेवा शुल्क द्यावा लागणार आहे.
 
विशेष म्हणजे, पैसे मागवताना कंपनीकडून तुम्हाला कोणत्याही वस्तू घेण्याचा आग्रह केला जाणार नाही. देश वेगाने डिजिटलायझेशनच्या दिशेने जात आहे. त्यामुळेच आम्ही परिस्थितीनुसार अनेक योजना सुरू केल्या आहेत. हे बदल सोप्या पद्धतीने लागू करण्यासाठी आता वॉलेट आणि कार्ड ऑन डिलिव्हरी आदींसह फ्री चार्ज भागिदारी अशी अनेक पावले उचलली आहेत, असे स्नॅपडीलचे सहसंस्थापक रोहीत बन्सल यांनी सांगितले. सध्या गुडगाव आणि बेंगळुरू येथे ‘कॅश अॅट ऑर्डर सर्व्हिस’ सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत इतर मोठ्या शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी नाशिक येथून गोदावरीचे पवित्र जल