RBI New Notes: अमेरिकेत डॉलरच्या (USD) वेगवेगळ्या नोटांवर जसे अमेरिकेतील विविध महापुरुषांची छायाचित्रे आहेत, त्याच प्रमाणे भारतातही नोटांवर महात्मा गांधीं शिवाय इतर महापुरुषांची छायाचित्रे वेगवेगळ्या नोटांवर छापण्यात यावीत, अशी मागणी भारतात वेळोवेळी करण्यात आली आहे.
भारतीय नोटांवर नेहमीच महात्मा गांधींचे चित्र पाहिले जाते, परंतु काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय रिझर्व्ह बँक आता भारतीय चलनात मोठा बदल करण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात आले आहे. नोटांवर छापण्यात आलेल्या महात्मा गांधींच्या चित्रामुळे हा बदल होणार आहे. हे वृत्त प्रसारमाध्यमांचे मथळे बनल्यानंतर आरबीआयने या संदर्भात आपले विधान जारी करून या अटकळांना खोडून काढले आहे. भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी तसंच रवींद्रनाथ टागोर, एपीजे अब्दुल कलाम यांसारख्या महापुरुषांची छायाचित्रे छापल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. रिझव्र्ह बँकेने (आरबीआय) सोमवारी मीडियाच्या अनेक विभागांमध्ये या संदर्भात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बातम्यांचे खंडन केले. सध्याच्या भारतीय चलनात कोणताही बदल नसल्याचे सेंट्रल बँकेने स्पष्ट केले.
रिपोर्टनुसार,भारतीय चलनाबाबत रिझर्व्ह बँक (RBI) मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते. लवकरच तुम्हाला नोटांवर रवींद्र नाथ टागोर आणि मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांचे फोटोही दिसू शकतात. असे सांगण्यात येत होते. रिझर्व्ह बँकेने एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे की, "माध्यमांच्या काही विभागांमध्ये अशा बातम्या येत आहेत की रिझव्र्ह बँक बँक सध्याच्या चलनात आणि नोटांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे आणि त्याऐवजी महात्मा गांधींचे छायाचित्र इतर महान व्यक्तींच्या छायाचित्रांनी लावले आहे." सध्या रिझर्व्ह बँकेकडे असा कोणताही प्रस्ताव नाही