Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Johnny Lever : जॉनी लिव्हरची मुलासह मराठी चित्रपटात एंट्री

Johnny Lever  : जॉनी लिव्हरची मुलासह मराठी चित्रपटात एंट्री
, शनिवार, 1 जुलै 2023 (17:28 IST)
चित्रपट सृष्टीत बाप लेकाची जोडी एकत्र दिसणे सहज आहे. कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांनी आपल्या कॉमेडीमुळे लोकांच्या मनात जागा मिळवली आहे. आता जॉनी लिव्हर आणि त्यांच्या मुलगा जेसी लिव्हर ही जोडी आता मराठी चित्रपटाकडे वळले असून आता ही जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अफलातून या चित्रपटातून बाप लेकाची जोडी एकत्र दिसणार आहे. अफलातून या चित्रपटातून जॉनी लिव्हर आणि त्यांच्या मुलगा जेसी एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जॉनी लिव्हर नवाब साहेब तर त्यांच्या मुलगा जेसी लिव्हर आफताबच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जॉनी आणि जेसी पिता पुत्राची जोडी मराठी सिने सृष्टीत झळकणार आहे. 
 
अफलातून चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित झाला असून सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर शेअर केला आहे. कॉमेडी बघा, कॉमेडी ऐका, कॉमेडी बोला असे या टीझरला कॅप्शन दिले आहे. 
 

अफलातून या चित्रपटात जॉनी लिव्हर, जेसी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, विजय भाटकर, तेजस्विनी लोणारी, भरत दाभोलकर, जयेश ठक्कर, परितोष पेंटर, रेशम टिपणीस आणि  विष्णू मेहरा हे कलाकार दिसणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Singer Ranjit Sidhu Death : पंजाबी गायक रंजीत सिद्धूची आत्महत्या