Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रशांत दामले, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, हृता दुर्गुळे या दिग्गज कलाकारांनी नटलेली, जिओ स्टुडिओजची पहिली मराठी वेबसिरीज "एका काळेचे मणी" प्रदर्शनास सज्ज

प्रशांत दामले, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, हृता दुर्गुळे या दिग्गज कलाकारांनी नटलेली, जिओ स्टुडिओजची पहिली मराठी वेबसिरीज
, सोमवार, 19 जून 2023 (14:33 IST)
मी वसंतराव आणि गोदावरी चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता जिओ स्टुडिओज् त्यांची पहिली ओटीटी कौटुंबिक कॉमेडी वेबसिरीज "एका काळेचे मणी" प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यानिमित्ताने जिओ स्टुडिओज आणि महेश मांजरेकर एकत्र आले असून यात प्रशांत दामले, समीर चौघुले, विशाखा सुभेदार, हृता दुर्गुळे, पौर्णिमा मनोहर, रुतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर अशा धम्माल कलाकारांची फौज प्रेक्षकांना पोट धरून हसवायला सज्ज झाली आहे.
 
ही गोष्ट आहे मध्यमवर्गीय काळे कुटुंबाची ज्यात एक बाप आहे, जो घरचा मुख्य म्हणून आपली प्रतिमा जपण्यासाठी धडपडत आहे, एक आई जिचे जग तिच्या मुलांच्या लग्नाभोवती फिरतेय, एक प्राणीप्रेमी मुलगी जिला पाळीव प्राणी आणि त्यांच्यासाठी कपड्यांचा ब्रँड तयार करायचा आहे, एक मुलगा जो डॉक्टर असून जो आयरर्लंडमधून पीएचडी करत आहे. आणि अशा ह्या आगळ्या वेगळ्या कुटुंबाचे शेजारी ही तितकेच विचित्र आहेत बर का.. असे शेजारी ज्यांना आपल्या मुलीचं लग्न काळे कुटुंबात करून द्यायचं आहे.
 
भन्नाट विनोदाने नटलेली, जबरदस्त डायलॉग बाजी असलेली ही वेबसिरीज येत्या २६जून रोजी जिओ सिनेमावर रीलीज होत आहे.
 
या मालिकेची संकल्पना ऋषी मनोहर याची असून, त्याचं लिखाण ओम भूतकर याने केलं आहे. आणि अतुल केतकर यांनी या पहिल्या सिझन दिग्दर्शन केलं आहे. 
 
 
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, महेश मांजरेकर, रुतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर निर्मित, अतुल केतकर दिग्दर्शित "एका काळेचे मणी" २६ जून पासून जिओ सिनेमा वर होणार रिलीज!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आदिपुरुषचा खेळ नालासोपाऱ्यात हिंदू संघटनेने पाडला बंद