Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या चित्रपट कलाकारांनी केली गोदावरीची महाआरती

या चित्रपट कलाकारांनी केली गोदावरीची महाआरती
, शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (14:33 IST)
गोदेचा खळखळाट, दिव्यांचा लखलखाट,आणि वैदिक मंत्रघोष अशा मंगलमय वातावरणाने गोदावरी चित्रपटाचे कलाकार व नाशिककर भारावून गेले निमित्त होते ते गोदावरीच्या महाआरतीचे, नाशिक शहराची जीवनवाहिनी अन समस्त नाशिककरांसाठी परम श्रध्येय असणाऱ्या गोदावरीचे आशीर्वाद घेण्यासाठी गोदावरी सिनेमातील प्रमुख कलाकारांनी गोदावरीची आरती केली.
 
या वेळी अभिनेता जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, लेखक प्राजक्त देशमुख, दिग्दर्शक निखिल महाजन, जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड निखिल साने, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, महंत अनिकेत शास्त्री देशपांडे, भक्ती चरणदास महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमास हजारो नाशिककरांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या आरती साठी प्रसाद गर्भे, विनायक चंद्रात्रे, संदीप मानकर, चिन्मय खेडेकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Edited by- Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अपघात आता झाला