Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता आयपीएलच्या तयारीला येणार वेग; यूएईत पुन्हा एकदा रंगणार थरार

आता आयपीएलच्या तयारीला येणार वेग; यूएईत पुन्हा एकदा रंगणार थरार
, गुरूवार, 23 जुलै 2020 (13:41 IST)
डियन प्रीमियर लीगच्या Indian Premier League १३ व्या पर्वाचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये होण्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. आयपीएल संचालन परिषदेचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्या वक्तव्यानंतर याला अधिक बळ आले. पुढील आठवड्यात सरकारच्या परवानगीनंतर तयारीला वेग येणार आहे.
 
अनेक फ्रेन्चायसी तर यूएईत तयारीत व्यस्त आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकादरम्यान या झटपट क्रिकेटचा पहिला टप्पा यूएईतच यशस्वीपणे पार पडला होता. भारतीयांसाठी For Indians हे आवडीचे स्थान आहे. अब्दूल रहमान बुखातीर यांच्या प्रयत्नांमुळे आंतरराष्टÑीय क्रिकेटचे हे स्थायी केंद्र बनले. दुबईत आयसीसीचे कार्यालय आहे. कोरोना प्रकोपातही यूएई सर्वांत सुरक्षित मानले जात आहे.
 
याच कारणांमुळे भारतासह विदेशातील खेळाडू निश्चिंत होऊन आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरीसाठी सज्ज होतील. यूएईत सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात हवामान उत्तम असते. येथे मर्यादित मैदानावर सामने होणार असल्याने विमान प्रवासाची समस्या जाणवणार नाही. भारत-यूएई यांच्यात वेळेचे अंतर दीड तास आहे. यामुळे टीव्हीवर सामने पाहणाऱ्यांना फारसा त्रास जाणवणार नाही.
 
यूएईत येथे होतील सामने
क्रिकेटची सुरुवात शारजापासून झाली तरी सध्या हे मैदान मागे पडले. दुबई आणि अबुधाबी ही शहरे आता आघाडीवर आहेत. दुबई शहरात आंतरराष्टÑीय स्टेडियम आणि आयसीसी क्रिकेट अकादमी मैदान आहे. येथे नियमितपणे सामने होतात. अबुधाबी येथे शेख झायेद क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने खेळविले जातील.
दुबई आणि अबुधाबी येथील खेळपट्ट्या मंद असल्यामुळे भारतातील सामन्यांसारखा धावांचा पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. फिरकी आणि मध्यम जलद गोलंदाज येथे प्रभावी ठरू शकतात. फटका मारताना स्वत:वर नियंत्रण राखण्याचे आव्हान फलंदाजांपुढे असणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील ९ वी आणि ११ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अजून एक संधी