Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रशिक्षक झाल्यानंतर राहुल द्रविडची मेगा लिलावाच्या रणनीतीवर अधिकाऱ्यांचीशी चर्चा

Rahul Dravid
, रविवार, 8 सप्टेंबर 2024 (11:13 IST)
राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या पदावर नियुक्ती झाल्यापासून आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाच्या पार्श्वभूमीवर रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. द्रविडयांना शुक्रवारी राजस्थान संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. द्रविडने मात्र आपले काम सुरू केले असून राजस्थान रॉयलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
 
द्रविड मीटिंग रूममध्ये प्रवेश करत म्हणाले,  'हॅलो, इथेच आयपीएल जिंकले आहे.' यानंतर ते  इतर लोकांशी चर्चा करू लागले . फ्रँचायझीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
 
द्रविडने नवी जबाबदारी मिळाल्याने आगामी आव्हानांसाठी सज्ज आहे. ते म्हणाले, विश्वचषकानंतर, मला वाटते की माझ्यासाठी आणखी एक आव्हान स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे आणि ते करण्यासाठी रॉयल्स ही योग्य जागा आहे. माजी रॉयल्स कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी 2011 ते 2015 पर्यंत फ्रँचायझीसोबत पाच हंगाम घालवले आणि आता ते संघासोबत काम करण्यास सुरुवात करतील.

राजस्थान रॉयल्सने 2008 पासून कधीही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. राजस्थान 2022 च्या मोसमात उपविजेता ठरला होता. राजस्थान संघ आयपीएल 2024 हंगामाच्या प्लेऑफमध्ये पोहोचला होता, द्रविडच्या कार्यकाळातच भारताने यावर्षी टी-20 विश्वचषक जिंकला होता. भारताच्या विजेतेपदानंतर द्रविडने भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोडले. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Paris Paralympics : नवदीपने पुरुषांच्या भालाफेक F41 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले