Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्ल्ड कप 2023 : टीम इंडियाची घोषणा; 4 मुंबईकरांची वर्णी, राहुल आणि इशान संघात, आर अश्विनला स्थान नाही

वर्ल्ड कप 2023 : टीम इंडियाची घोषणा; 4 मुंबईकरांची वर्णी, राहुल आणि इशान संघात, आर अश्विनला स्थान नाही
, मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (15:01 IST)
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 साठी भारताचा 15 जणांचा पुरुष संघ जाहीर झाला असून टीममध्ये सात फलंदाज, चार गोलंदाज आणि चार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे.
 
भारतीय संघात रोहितसोबतच शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या मुंबईच्या चार खेळाडूंना स्थान मिळालं आहे.
 
मे 2023 पासून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये न खेळूनही केएल राहुलचा भारतीय संघात समावेश झालाय. राहुलसोबतच इशान किशन यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात असेल.
 
भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन तसंच युजवेंद्र चहल यांना अंतिम पंधरा जणांत स्थान मिळालेले नाही.
 
त्यामुळे विश्वचषकात कुलदीप यादव या एकमेव मुख्य फिरकी गोलंदाजावर भारताची मदार राहील. भारतीय संघात स्पेशलिस्ट ऑफस्पिनरचा समावेश झालेला नाही.
 
बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी श्रीलंकेत पत्रकार परिषदेत भारतीय संघ जाहीर केला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही यावेळी उपस्थित होता.
 
आशिया चषकासाठी भारतीय संघ सध्या श्रीलंकेत आहे. या स्पर्धेत भारतीय संघात असलेला वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि मधल्या फळीचा फलंदाज तिलक वर्मा या दोघांना विश्वचषकासाठीच्या संघात मात्र स्थान मिळालेलं नाही.
 
कोण कोण आहेत संघात?
रोहित शर्मा (कर्णधार)
हार्दिक पंड्या (उप-कर्णधार)
शुभमन गिल
विराट कोहली
श्रेयस अय्यर
सूर्यकुमार यादव
के.एल. राहुल (यष्टीरक्षक)
इशान किशन (यष्टीरक्षक)
रवींद्र जाडेजा
अक्षर पटेल
कुलदीप यादव
शार्दूल ठाकूर
जसप्रीत बुमरा
मोहम्मद सिराज
मोहम्मद शमी
के. एल. राहुल आणि इशान दोघंही संघात
विश्वचषकासाठीच्या संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुल आणि इशान किशनपैकी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती, पण दोघांचाही टीममध्ये समावेश झाला आहे.
 
खरंतर केएल राहुल यंदा मार्चमध्ये अखेरचा वन डे सामना खेळला होता. आयपीएलदरम्यान मांडीतील स्नायू दुखावल्यानं त्याला शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं. तेव्हापासून तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही.
 
Published by- Priya Dixit
 
Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Cupसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर, 6 खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार, 4 तिसऱ्यांदा खेळणार