rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फ्रेंच कैद्याने तुरूंगात पत्नीसाठी बनवला ताजमहाल

फ्रेंच कैद्याने तुरूंगात पत्नीसाठी बनवला ताजमहाल
आपल्या प्रिय पत्नीसाठी बनवलेली जगातील सुंदर वास्तू म्हणजे ताजमहालचे निर्माण कोणीच करू नये म्हणून शहाजहानने ताजमहाल बनवणार्‍या कारगीरांचे हात तोडले होते अशा अनेक कथा ऐकिवात आहेत. तसा ताजमहाल कोणीच बनवू नये एवढीच त्याची इच्छा होती. मात्र ही कलाकृती आपल्या प्रिय पत्नीसाठी बनवण्याचे धाडस आग्रामधील तुरूंगात राहणार्‍या एका फ्रेंच कैद्याने केले.
 
आपल्या पत्नीसाठी आगपेटीच्या काड्यांपासून उत्तरप्रदेशमधील एका परदेशी कैद्याने सुंदर ताजमहाल बनवला आहे. हा ताजमहाल आपल्या पत्नीपर्यंत पोहोचवण्याची त्याची शेवटची इच्छा आहे. सोनोली सीमारेषेवर अल्बर्ट पास्कल नावाच्या फ्रान्सच्या नागरिकाला अमली पदर्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते.
 
उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील तुरूंगात तो शिक्षा भोगत आहे. त्याने आपल्या शिक्षेच्या काळात आपल्या प्रिय पत्नीसाठी हा ताजमहाल बनवला. अल्बर्ट हा एड्सबाधित आहे, त्याचप्रमाणे जेलमध्ये राहून त्याच्या मा‍नसिक स्थितीवर ‍परिणाम झाला असल्यामुळे त्याला नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी तुरूंगातील प्रशासनाने त्याच्या कलागुणांना वाव देण्याची संधी दिली आहे. अल्बर्टने हा ताजमहाल तुरूंगातील अन्य दोन कैद्यांच्या मदतीने बनवला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दीपाने परत केली सचिनच्या हस्ते मिळालेली बीएमडब्ल्यू