Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तरुणांसाठी खुशखबर! महाराष्ट्र जलसंपदा विभागात तब्बल 4497 पदांवर भरती जाहीर

jobs
, शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (08:01 IST)
WRD Maharashtra Recruitment 2023 राज्य सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागामार्फत (Jalsampada Vibhag Bharti) विविध पदांसाठी मेगाभरती होणार आहे. यासाठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. WRD Maharashtra Recruitment 2023
 
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 03 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार wrd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 4 हजार 497 पदे भरली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. WRD Maharashtra Bharti 2023
 
या पदांसाठी होणार भरती :
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित), कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-क), भूवैज्ञानिक सहाय्यक (गट-क), आरेखक (गट-क), सहाय्यक आरेखक (गट-क), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क), अनुरेखक (गट-क), दप्तर कारकुन (गट-क), मोजणीदार (गट-क), कालवा निरीक्षक (गट-क), सहाय्यक भांडारपाल (गट-क), कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट-क).
 
शैक्षणिक पात्रता: पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी
 
वयोमर्यादा: लवकरच उपलब्ध होईल.
परीक्षा शुल्क (फी): खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी- ₹.१०००/-, मागासवर्गीय/आ.दू. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.९००/-.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023.
 
इतका पगार मिळेल :
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब – 44,900/- ते 1,42,400/-
निम्नश्रेणी लघुलेखक – 41,800/- ते 1,32,300
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक -41,800/- ते 1,32,300
भूवैज्ञानिक सहाय्यक – 38600/- ते 1,22,800/-
आरेखक – 29,200/- ते 92,300/-
सहाय्यक आरेखक – 25,500/- ते 81,100/-
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 25,500/- ते 81,100/-
प्रयोगशाळा सहाय्यक – 21,700/- ते 69,100
अनुरेखक – 21,700/- ते 69,100/-
दप्तर कारकुन – 19,900 ते 63,200/-
मोजणीदार – 19,900/- ते 63,200/-
कालवा निरीक्षक – 19,900/- ते 63,200/-
सहाय्यक भांडारपाल – 19,900/- ते 63,200/-
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक – 19,900/- ते 63,200/-

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hair Serum नारळाचं तेल आणि कोरफडीने या प्रकारे तया करा हेअर सीरम