महाराष्ट्र पोलीस मध्ये सरकारी नोकऱ्या आहेत. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मध्ये सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी रिक्त जागा आहेत. अहवालानुसार, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबलच्या एकूण 105 जागा रिक्त आहेत. यासाठी अर्ज ऑफलाइन करावा लागेल. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 5 जून 2022 आहे. या भरतीबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र राज्य राखीव दल
maharashtrasrpf.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊ शकता.
पात्रता -
राज्य राखीव पोलीस दलात सशस्त्र कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयो मर्यादा -
राज्य राखीव पोलीस दलात सशस्त्र कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवारांचे किमान वय 16वर्षे आणि कमाल 25 वर्षे आहे.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.