Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मशरूम ने काळेभोर घनदाट केस होतात

मशरूम ने काळेभोर घनदाट केस होतात
, बुधवार, 7 जुलै 2021 (22:41 IST)
केसांना घनदाट आणि काळे भोर बनविण्यासाठी मशरूम फायदेशीर आहे.आपल्या आहारात याचा समावेश करावा. या मध्ये व्हिटॅमिन डी, अँटीऑक्सीडेंट, खनिजे, जसे की सेलेनियम आणि कॉपर आढळतात. हे केसांना निरोगी बनवतो कसे काय चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* केस गळण्यापासून आराम मिळतो- 
ज्या स्त्रियांना केसांच्या गळतीचा त्रास आहे त्यांनी मशरूम वापरावे. या मध्ये अँटी मायक्रोबियल, अँटी बेक्टेरियल आणि इतर पोषक घटक आढळतात जे स्कॅल्प ला स्वच्छ करून केसांची वाढ करतात.
 
*  केसांना निरोगी ठेवतो- 
या मध्ये कॉपर आढळतो जे अन्नातून आयरन शोषून घेत, या मुळे केसांचा रंग काळा राहतो. कॉपर आणि आयरन दोन्ही मिळून केसांना निरोगी आणि बळकट करतात. 
 
* केसांची वाढ करतो-
मशरूम मध्ये मुबलक प्रमाणात सेलेनियम आढळते, जे केसांना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. हे सेलेनियम स्कॅल्प वरील फंगस नाहीसे करतो. केसांना पांढरे होण्यापासून वाचवतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केळीत असलेले औषधी गुण