Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नानंतर उजळत अशा लोकांचे भाग्य

लग्नानंतर उजळत अशा लोकांचे भाग्य
, सोमवार, 17 जून 2019 (19:18 IST)
ज्‍योतिष्यात हस्तरेषेचे विशेष स्थान आहे. हस्तरेषांद्वारे तुम्ही भविष्याबद्दल जाणून घेऊ शकता. हस्तरेषा ज्योतिष्यानुसार लोकांच्या हातातील रेषाबघून त्यांच्या भविष्याचे खरो खरे अनुमान लावले जातात. हातात बनणार्‍या रेषा आणि पर्वतांच्या उभाराच्या आधारावर जीवनातील बर्‍याच घटनांचे आधीच माहीत पडून जाते. हस्तरेषेत जीवन रेषा सर्वात खास असते. हाताच्या अंगठ्याच्या खाली जीवन रेषा असते.   
 
हातातून जर या जागेवरून एखादी रेषा निघून शनी पर्वतावर जाऊ मिळते तर अशा व्यक्तींचे भाग्योदय विवाहानंतर होतो. ज्यांच्या हाताची रेषा अशी असते ते व्यक्ती आपल्या जीवनात आपल्या कलेच्या माध्यमाने प्रसिद्धी मिळवतात, पण याचबरोबर त्यांच्या जीवनात बर्‍याच वेळा संकट देखील येतात. असे होण्यामागचे कारण असे आहे की व्यक्तीची भाग्य रेखा त्याच्या जीवन रेषेला कापून पुढे जाते. ज्यामुळे जीवनात बरेच चढ उतारांसोबत अडचणींना सामोरे जावे लागते. जर कोणाच्या हातात विवाह रेषा वरच्या बाजूला वाकलेली असेल आणि ती हाताच्या लहान बोटापर्यंत जात असेल तर अशा व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात बर्‍याच अडचणी येतात. ज्यांच्या हातात विवाह रेषा अशी असते त्यांच्या विवाहात अडचणी येतात. पण बर्‍याच अडचणींना तोंड देऊन त्या लोकांचे विवाह होऊन जातात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज रात्री करा हा लहान सा उपाय