Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केतू दोष: धोकादायक ग्रहापासून बचावासाठी उपाय

केतू दोष: धोकादायक ग्रहापासून बचावासाठी उपाय
नक्षत्रमंडळात राहू आणि केतू हे क्षुद्र ग्रह मानले गेले आहेत. शनीपेक्षाही भीतिदायक कारण शनी निष्पाप लोकांना नुकसान करत नाही परंतू राहू-केतूसोबत असे नाही. केतू ग्रह व्यक्तीला भम्रात पाडतो. नीच केतू व्यक्तीची मती भ्रमित करतो आणि त्याला गुन्हा करायला भाग पाडतो. असे लोकं चुकीच्या मार्गावर निघून जातात. वाईट संगतीमुळे धन हानी, संतानाची प्रगती न होणे, आरोग्यामुळे ताण हे देखील केतू दोष असल्याचे लक्षण आहेत. केतू दोष दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहे.
 
लाल चंदनाची 108 मणक्यांची माळ ज्योतिष्याकडून अभिमंत्रित करून मंगळवारी धारण करावी.
माळा धारण करण्यापूर्वी केतू मंत्र “ पलाश पुष्प संकाशं, तारका ग्रह मस्तकं। रौद्रं रौद्रात्मकं घोरं तम के तुम प्रण माम्य्हम।“ 108 वेळा जपावा.
केतूच्या दुष्प्रभावापासून बचावासाठी याचा रत्न लहसुनिया धारण करावा.
घरात केतू यंत्राची स्थापना करावी. केतू मंत्र “ ॐ प्रां प्रीं प्रूं सह केतवे नम:” चा 10008 वेळा जप करवून यंत्र अभिमंत्रित करवावे.
किंवा केतू मूल मंत्राचा 40 दिवसात 18, 000 वेळा जप करावा.
केतू बुद्धी भ्रष्ट करणारा कारक असल्यामुळे दुष्परिणामापासून बचावासाठी गणपती आणि देवी सरस्वतीची आराधना करावी.
दर रोज ऊं गं गणपतये नम मंत्राची एक माळ जपावी.
गणपती अथर्वशीर्ष पाठ करावा.
घरात दररोज संध्याकाळी गायीच्या तुपाचा दिवा लावावा.
स्वत:जवळ हिरवा रुमाल असू द्यावा.
स्त्रियांचा अपमान करू नये आणि कुमारिकांची पूजा करावी. कुमारिकांना रविवारी गोड दही आणि शिरा खाऊ घालावा.
पिंपळाच्या झाडाखाली कुत्र्याला पोळी खाऊ घालावी.
कृष्ण पक्षात दररोज संध्याकाळी एका द्रोणात दहीभातावर काळे तीळ टाकून पिंपळाच्या झाडाखाली ठेवून केतू दोष शांती हेतू प्रार्थना करावी.
घराच्या मुख्या दरावर दोन्ही बाजूला तांब्याची खीळ लावावी.
पिवळ्या कपड्यात सोनं, गहू बांधून ब्राह्मणाला दान करावं.
दूध, तांदूळ, मसूर डाळ दान करावी.
गाय, लोखंड, तीळ, तेल, सप्तधान्य, शस्त्र, नारळ, उडीद डाळ दान केल्याने देखील ग्रहाची शांती होते.
मंदिरात काळं आणि पांढर्‍या रंगाचा कांबळे दान करणे योग्य ठरेल.
उजव्या हातात अंगठी घातल्याने लाभ मिळेल.
सलग 43 दिवस मंदिरात केळं दान करावे.
काळे व पांढरे तीळ वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कोणती धातू आहे भाग्यशाली