Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता, केळीच्या रंगावरून समजते की ते फायदेशीर आहे की नाही

काय सांगता, केळीच्या रंगावरून समजते की ते फायदेशीर आहे की नाही
, गुरूवार, 4 मार्च 2021 (09:30 IST)
केळी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे तर सर्वांनाच माहीत आहे. परंतु  केळीचे रंग देखील बरेच काही सांगत असतात की ते किती पौष्टिक आहे. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
* पिवळ्या केळी मऊ आणि जास्त गोड असतात. या मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असतात. तरी ही हे पचण्याजोगे असतात.
 
* हिरव्या केळी कच्च्या असतात त्याचा वापर भाजी आणि चिप्स बनविण्यासाठी केला जातो.
 
* केळीवर असलेले तपकिरी डाग केळीचे आयुष्य सांगतात तसेच हे देखील सांगतात की यामधील स्टार्च साखर बनले आहे. केळीवर जेवढे अधिक तपकिरी डाग असतात त्यामध्ये साखरेचे प्रमाण तेवढेच जास्त असते.
 
* असं म्हणतात की केळीवर काळे डाग नसावे. असं असेल तर केळी लवकर खराब होण्याची शक्यता असते. केळी असे फळ आहे जे जास्त दिवस चालत नाही. दोन तीन दिवसातच खराब होऊ लागते. केळी हे लक्षात ठेवून खरेदी करावे की किती दिवसात हे संपणार आहेत.  
 
* केळीवरील हिरवा रंग सांगतो की हे केळी अजून पिकले नाही हे कच्चे आहे. म्हणून त्याची चांगली चव येणार नाही.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरचा वैद्य :पोटाच्या गॅसच्या त्रासाला बरे करतात हे घरगुती उपचार