कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे आता लोकांची जीवनशैलीच बदलत आहे. दरम्यान लॉकडाऊनमध्ये सर्व घरी असताना जगण्याची वेगळीच पद्धत निर्माण झाली. परिणामस्वरुप लोकांचं वजन वाढलं. घरातील पदार्थाचे सेवन करुन देखील लोकांचे वजन कसे वाढले यावर संशोधकांनी अभ्यास केला तर मुख्य कारणं कळून आले.
यूकेच्या स्लिमिंग वर्ल्ड वेट लॉस ऑर्गनायझेशनने केलेल्या एका स्टडीत सर्वेक्षणात सामील लोकांच्या आरोग्य, आहार पद्धत, शारीरिक कार्य, मूड तसेच वजनाबद्दल विचारपूस करण्यात आली. हे सर्वेक्षण युरोपियन अँड इंटरनॅशनल काँग्रेस ऑन ऑबेसिटी (ECOICO) मध्ये मांडण्यात आलं.
या दरम्यान सामान्य लोकांच्या तुलनेत नियमित व्यायाम करणार्यांचं आरोग्य तसेच फिटनेस नीट असल्याचं दिसून आलं. तसेच इतर लोकांमध्ये वजन वाढण्याची चार मुख्य कारणं दिसून आली ती म्हणजे-
बाहेर निघणे शक्य नसल्यामुळे पौष्टिक आहार खरेदी करणे अवघड असणे
घरात राहून आळसी प्रवृत्ती आणि सतत काही खात राहणे
तणावामुळे खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल
शारीरिक व्यायाम नसून घरात आराम बसून राहणे.
या सर्वांचा परिणाम आरोग्यावर दिसून आला.