विकास सिंह
देशातील कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटसंबंधीच्या वाढत्या प्रकरणांनंतर कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबतची चर्चा तीव्र झाली आहे. डेल्टा प्लस व्हेरियंट आणि कोरोनाच्या तिसर्या लहरी संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रश्नांसंदर्भात वेबदुनिया यांनी एम्स भोपाळचे संचालक डॉ. सरमन सिंग यांच्याशी विशेष संवाद साधला.
डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येईल का? - डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसर्या लहरींच्या आगमनाच्या प्रश्नावर भोपाळ एम्सचे संचालक डॉ. सरमन सिंह म्हणतात की जर विषाणूमध्ये नवीन म्युटंट झाले तर एक नवीन लहर येते. जर तिसरी लहर असेल तर डेल्टा प्लस व्हेरियंट असेल किंवा काही इतर दुसरे व्हेरियंट असतील,ते बघावे लागणार कारण जीनोम सीक्वेन्सिंग सतत चालू आहे आणि जसं जसं डेटा येत आहे त्यात व्हायरसमध्ये नवीन म्युटंट सापडले आहेत.
एम्सचे संचालक सांगतात की नवीन व्हेरियन्ट बरोबरच आपण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोविड प्रोटोकॉल ला घेऊन जसा निष्काळजीपणा केला तसाच यावेळी केला तर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते.
डेल्टा प्लस,ही डेल्टा व्हेरियंट पेक्षा अधिक घातक आहे?
कोरोना विषाणूचा डेल्टा प्लस व्हेरियंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा लोकांना अधिक वेगाने संक्रमित करू शकतो, असे भोपाळ एम्सचे संचालक सरमन सिंग यांनी सांगितले. ते म्हणतात की डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या प्राणघातकतेची आणि संक्रमित करण्याच्या क्षमतेची माहिती अद्याप येत आहे आणि त्याचे विश्लेषण होणे बाकी आहे.
डेल्टा प्लस व्हेरियंट देखील डेल्टा व्हेरियंट प्रमाणेच प्राण घातक आणि वेगाने संक्रमित करणारा आहे.असं देखील होऊ शकत की डेल्टा प्लस व्हेरियंटची संक्रमित करण्याची क्षमता अधिक जास्त असेल.डेल्टा प्लस व्हेरियंट ला घेऊन युरोपियन देशात आणि देशात जे प्रकरण समोर आले आहे.त्याविषयी अभ्यास केला जात आहे.
डेल्टा प्लस व्हेरियंटची लक्षणे आणि प्रतिबंध काय आहेत?
डेल्टा प्लस व्हेरियंट कोरोना जंतुसंसर्ग झालेल्या व्यक्तीला कोरोना सारखीच लक्षणे आढळतात.यामध्ये सर्दी,ताप,कोरडा खोकला,शरीरात वेदना होणं,अतिसार आणि डोळे लाल होणे इत्यादी लक्षणे आहे.आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की कोरोना विषाणूमध्ये कितीही म्युटंट झाले तरीही त्याच्या आकारात काही फरक पडत नाही, म्हणून जर आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग टाळायचा असेल तर आपण मास्क नियमित वापरावे आणि जास्त गर्दीत जाणे टाळावे लागेल.
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियन्ट पासून मास्क वाचवणार-
ते म्हणतात की मी नेहमीच सांगतो की मास्क ही सामाजिक लस आहे.कोरोनाचे अल्फा,बीटा,गामा,डेल्टा किंवा डेल्टा कोणतेही व्हेरियन्ट असो त्यापासून मास्क आपले संरक्षण करणार.
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या ट्रान्समिशन मार्गात कोणताही फरक होणार नाही.ते म्हणतात की अशा प्रकारचे श्वसन विषाणू लोकांना नाक आणि तोंडातून हवेद्वारे संक्रमित करतात आणि डेल्टा प्लस व्हेरियन्ट देखील लोकांना अशा प्रकारे संक्रमित करेल.