Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता, रक्तदाबासाठीं हिंग प्रभावी आहे हिंगाचे इतर फायदे जाणून घ्या

काय सांगता, रक्तदाबासाठीं हिंग प्रभावी आहे हिंगाचे इतर फायदे जाणून घ्या
, सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (18:50 IST)
आपल्या घराच्या स्वयंपाकघरातील बरेच मसाले असे असतात जे आपल्या अन्नाची चव आणि अन्नाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. जर आपण असे ही म्हटले की मसाल्यांशिवाय खाणे अपूर्ण आहे तर असं म्हणणे चुकीचे नाही. जिरे,हळद,गरम मसाला, ओवा,मीठ हे सर्व तर आपण दररोज वापरतोच. या पैकी एक हिंग आहे जे आपल्या अन्नाची चव वाढवते आणि अन्नाला एक नवीन सुवास देते.  हिंग बरेच रोग बरे करण्यासाठी  प्रभावी मानले आहे. चला तर मग हिंगाचे फायदे जाणून घेऊ या.
  
1 दात दुखीसाठी प्रभावी- 
आपण आपले दात दररोज टूथपेस्टने स्वच्छ तर करतोच, परंतु  बऱ्याच वेळा आपल्याला दातदुखीच्या किंवा इतर काही समस्या उद्भवतात.या साठी हिंग मदत करतो. हिंगात अँटी ऑक्सीडेंटचे गुणधर्म आढळतात, जे दाताच्या दुखण्यासाठी आणि संसर्गाला दूर करण्यात मदत करतात.या साठी हिंगाला पाण्यात घालून उकळवून घ्या आणि त्या पाण्याने गुळणे करा.असं केल्यानं दाताच्या दुखण्यापासून आराम मिळेल.
 
2 कानाचे दुखणे बरे होते-
बऱ्याच वेळा कानात दुखते, अशा परिस्थितीत आपण कानात औषध (ड्रॉप) घालतो, परंतु आपल्याला हे माहीत आहे का, की हिंगात अँटी इंफ्लिमेंटरी आणि अँटी बायोटिक गुणधर्म आढळतात जे कानाच्या वेदनेमध्ये आराम देतात. या साठी आपल्याला एका भांड्यात दोन चमचे नारळाचं तेल गरम करायचे आहे.त्यामध्ये चिमूटभर हळद घालून मंद आचेवर गरम करायचे आहे. कोमट झाल्यावर थोडंसं कानात घाला. असं केल्यानं आपल्याला आराम मिळेल. 
 
3 पोटदुखी आणि गॅस साठी प्रभावी -
लोकांना पोटदुखी आणि गॅस बनायची तक्रार असते. या त्रासापासून हिंग आपल्याला आराम मिळवून देतो.हिंगात अँटी इंफ्लिमेंट्री आणि अँटी ऑक्सिडंटचे गुणधर्म आढळतात, जे गॅस आणि पोटदुखी मध्ये आराम मिळवून देण्याचे काम करतात. या शिवाय डोकेदुखी असताना ते कमी करण्याचे काम देखील हिंग करतो. हिंगात अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म असल्यामुळे हे डोक्याच्या रक्तवाहिकांची सूज कमी करते, या मुळे हे डोकं दुखी पासून मुक्त करण्याचे काम करतो.  
 
4 सर्दी-पडसं मध्ये प्रभावी - 
हवामानात बदल झाल्यावर हिंगात अँटी व्हायरस चे गुणधर्म सर्दी-पडसं मध्ये आराम देतात. या शिवाय रक्तदाब नियंत्रित करण्याचे काम देखील  
हिंग करतो. हिंगात कोउमारिन नावाचे घटकआढळतात जे रक्त साकळू देत नाही आणि रक्त पातळ ठेवत. या मुळे रक्त दाब नियंत्रित होण्यास मदत मिळते. म्हणून हिंग खाण्याच्या सल्ला दिला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्टाईलिश दिसण्यासाठी या फॅशन टिप्स अवलंबवा