मोठे नखे आपल्या हातांच्या सौंदर्यात भर घालतात.एक काळ असा होता की नखांना केवळ गोल आकार दिला जात होता परंतु आता नखांना वेग वेगळ्या प्रकारे आकार दिला जातो.जरी ते एखाद्या समारंभानुसार छान दिसतात . परंतु आपल्या आरोग्याचे रहस्य आपल्या नखांमध्ये दडलेले आहे.आपल्या नखांवर येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आपल्या आरोग्याला दर्शवतात.चला तर मग नखांवर येणाऱ्या या रेषा काय सांगता जाणून घेऊ या.
1 नखे वारंवार तुटणे -जर आपली नखे वारंवार तुटतात किंवा लहान होतात तर त्याचा अर्थ आहे की आपण अशक्त आहात.आणि तसेच हे थॉयराइड असण्याचे संकेत देखील देतात.
2 उभ्या लांबोळक्या रेषा-संशोधनाच्या मते,अशा दीर्घ लांबोळक्या उभ्या रेषा वाढत्या वयाला दर्शवणाऱ्या असतात.लांबोळ रेषा 20 ते 25 टक्के लोकांमध्ये दिसतात.
3 आडव्या रेषा-जर आपल्या नखांवर अशा रेषा दिसतात तर हे संकेत आहे की आपली नखे हळू-हळू वाढतात.
4 लहान पांढरे डाग-नखांवर पांढरे डाग असतील तर ते हे संकेत देतात की आपल्या शरीरात रक्ताची कमतरता आहे.तसेच केसांची गळतीची समस्या आणि त्वचा संबंधित समस्या दर्शवतात.
5 लांब काळ्या रेषा-अशा प्रकारचा रेषा दिसल्यास दुर्लक्षित करू नका.सतत अशा प्रकारच्या रेषा दिसत असल्यास तर त्वरितच डॉक्टरशी सम्पर्क करा.या रेषा हृदय रोग असण्याचे संकेत देतात.