Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना नसला तरी ब्लॅक फंगस धोका

कोरोना नसला तरी ब्लॅक फंगस धोका
, बुधवार, 2 जून 2021 (14:47 IST)
देशातील काही राज्यांत काळ्या बुरशीचा आजार साथीचा रोग जाहीर झाला आहे. जीवघेणा सिद्ध होत असलेला हा आजार वेगाने लोकांचा बळी घेत आहे. मुख्य रूपात याचं इंफेक्शन नाक, तोंड, मेंदू आणि कानात होतो. अनेकांच्या पायात देखील याचं इंफेक्शन बघण्यात येत आहे. या आजारापासून सावध राहण्याची गरज आहे. सोशल मीडियावर, काळ्या बुरशीबद्दल एक प्रश्न खूप व्हायरल होत आहे की काय कोविड नसलेल्या रुग्णांनाही काळी बुरशी असू शकते का?
 
वेबदुनियाने तज्ञांशी या गंभीर प्रश्नावर चर्चा केली, ते काय म्हणाले जाणून घेऊया -
 
डॉ विनोद भंडारी, श्री अरबिंदो विद्यापीठ इंदूरचे फाउंडर - चेयरमॅन
यांनी सांगितले की हा आजार एका सामान्य माणासाला देखील होऊ शकतो. पूर्वीही होत होता. खबरदारी म्हणून मधुमेह नियंत्रणात ठेवा, जर तुम्हाला सर्दी किंवा कोणत्याही प्रकाराचे रेशेज दिसत असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. डोळ्यात कोणत्याही प्रकाराचा त्रास जाणवत असल्यास जसं अस्पष्ट दिसणं, डोळ्यात वेदना जाणवणं, डोळ्यातून पाणी येणं तर स्पेशलिस्टला दाखवा.
 
हा प्रकार सामान्य रूग्णांमध्ये फारच कमी घडत आहे. बहुधा कोरोना रूग्णांमध्ये आढळतं आहे, ज्यांची शुगर कंट्रोल नव्हती होतं. या आजारामुळे 50 टक्के मृत्यूचा दावा केला जात असला तरी असे काही नाही. ज्यांनी योग्य वेळी दाखविले त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. योग्य वेळ त्यावर उपचार करणे शक्य आहे.
 
डॉ निखिलेश जैन, सीएचएल यांनी सांगितले की ‘हे आवश्यक नाही. पण मधुमेह आणि कर्करोगाच्या रुग्णांमध्ये त्यांचा विकास होण्याची शक्यता जास्त असते. या संसर्गाचा वेगवान प्रसार होण्याचे कारण असे मानले जाते की हा नवीन विषाणू आपली प्रतिकारशक्ती कमकुवत करते, ज्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये याची शक्यता जास्त असते.
 
तसेच, कोविड दरम्यान ज्या रुग्णांनी जास्त एंटीबायोटिकचा वापर केला आहे त्यांना रोगाचा धोका वाढतो.
 
सामान्य माणसाने कोणती खबरदारी घ्यावी - अशा वेळी साखर पातळीची तपासणी करत रहा.
 
डॉ एके द्विवेदी, होमिओपॅथी डॉक्टरांनी सांगितले की ‘अशी काही प्रकरणे घडली आहेत ज्यात कोविड नसून काळी बुरशीचे संसर्ग झाला आहे. परंतु त्यामध्ये प्रतिकारशक्ती ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर आपली प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर कोणत्याही बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
 
सामान्य लोकांनी कोणती खबरदारी घ्यावी - 
फ्रीजमधील ठेवलेल्या किंवा शिळ्या गोष्टींचा वापर करू नये. 
आपले नाक, घसा काळजी घ्या. 
या वेळी नेहमीपेक्षा भिन्न लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. 
आपल्याला कोणत्याही पदार्थांची अॅलर्जी असल्यास, त्याचे सेवन करू नका.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऍसिडिटी किंवा सौम्य हृदयविकाराचा झटका यात फरक कसा करावा