स्त्रियांना त्यांचे वय विचारु नये तर पुरुषाला त्याचा पगार आणि विद्यार्थ्याला त्याचे मार्क्स खरंच खूप खूप त्रास होतो.
ज्या दिवशी विचार करतो की आता तर आयुष्यात खूप काही तरी मोठं करायचं… नेमकं त्याच दिवशी घरातले दळण आणायला पाठवतात.
वेळ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे स्वतःचा नाही तर दुसऱ्यांचा वाया घालवा.
आपण हुशार आहोत हे सिद्ध करता आले नाही तरी चालेल हो पण समोरचा वेडा आहे हे सिद्ध केलेच पाहिजे.
आयुष्यात माझे तीनच नियम माहित आहेत का ? आवेदन, निवेदन आणि तरीही नाही ऐकलं तर दे दणा दण.
आजच्या काळात फक्त कस्टमर केअरवाले खरी माणुसकी दाखवतात... जे गरीबापेक्षा गरीब असणाऱ्यांना पण आदर दाखवतात.
पोटाचा प्रश्न सुटला की सुटलेल्या पोटाचा प्रश्न असतो.. शेवटी काय तर पोटाचा प्रश्न कायम...
गुण जुळले की लग्न होतं आणि अवगुण जुळले की - मैत्री